आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान‎:रासेयाे शिबिरात 21 दात्यांचे रक्तदान‎

पारध‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे‎ //"युवकांचा ध्यास ग्राम व शहरी‎ विकास//" या विशेष श्रमसंस्कार‎ शिबिराचा समारोपप्रसंगी रक्तदान‎ शिबीर घेण्यात आले. यात २१‎ दात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना‎ प्रमाणपत्र देण्यात आले.‎ यावेळी प्राचार्य डॉ. राजाराम‎ डोईफोडे, विभागीय समन्वयक प्रा.‎ अनिल मगर, कार्यक्रमाधिकारी प्रा.‎ बाळासाहेब कावळे, प्रा. संग्राम राजे‎ देशमुख यांची उपस्थिती होती.‎

यावेळी रक्तदानाचे महत्व विशद‎ करण्यात आले. सात दिवसात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राबवण्यात आलेल्या विविध‎ सामाजिक उपक्रमांची माहिती‎ देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी‎ सात दिवसातील अनुभव कथन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केले. सुत्रसंचालन प्रा. अनिल मगर‎ यांनी केले. यावेळी अर्शद पठाण,‎ संतोष राजगुरे, कार्यालयीन‎ अधीक्षक के. टी. वाघ, उपप्राचार्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अमोल बांडगे यांच्यासह‎ स्वयंसेविका, स्वयंसेवक,‎ प्राध्यापक, ग्रामस्थ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...