आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुली अव्वल:उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ; बारावी परीक्षेत ग्रामीण भागातून मुलीच अव्वल

मंठा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा मंठा तालुक्याचा निकाल ९५ टक्के इतका लागला. तालुक्यातील रेणुका कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा आणि हेलस येथील छत्रपती संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. कोरोना महामारीनंतर प्रथमच यावर्षी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

रेणुका कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेसाठी ११८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतील १५५ विद्यार्थ्यांपैकी १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा ९८.२९ टक्के लागला. यावर्षी निकाल लागताच सर्व विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि कम्प्युटरवर आपला निकाल पाहिला. त्यामुळे निकाल असूनही महाविद्यालयाकडे विद्यार्थी दिसून आले नाहीत. विद्यार्थ्यांनी आपले निकाल सोशल मीडियावरून व्हायरल केल्यामुळे काही मिनिटात सर्व नातेवाईकांना देखील निकाल समजला. एकूण १२ वीच्या परीक्षेत यंदाही मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण जास्त होते. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी प्रथमच ऑफलाइन पद्धतीने बारावीची परीक्षा घेण्यात आली.

नवभारत कनिष्ठ महाविद्यालय
टेंभूर्णी । येथील नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. कला शाखेत १७९ विद्यार्थी तर व विज्ञान शाखेत ८७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी कला शाखेचा निकाल ९४.६७ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला शाखेत विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत एकून- ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विज्ञान शाखेत विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत एकूण- ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय काबरा, शेख जमीर शेख अमीर, प्रल्हाद टेंभूर्णीकर, मधुकर निकम, सुभाष राठी, सुरेश काबरा, अॅड.प्रेमसुख काबरा, विष्णू सांगुळे, प्रा.दत्ता देशमुख, प्राचार्य भास्कर चेके, एन. बी. काळे, डी. एस. उबरहंडे, प्रा. ए. जी. यदमाळ, सखाराम बोरकर, प्रा.मधुकर झटे, संजय कुलकर्णी, कैलास भुतेकर, सुनिल सकुंडे, गणेश सावसक्के आदींनी अभिनंदन केले.

तीर्थपुरी मत्स्योदरी महाविद्यालय
तीर्थपुरी । येथील मत्स्योदरी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल ९९.०९ टक्के तर वाणिज्य ९५.७८ टक्के व कला शाखेचा ९१.२० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रथम अश्मिता मुळे, वाणिज्य शाखेतून प्रथम अस्मिता धर्माधिकारी तर कला शाखेतून प्रथम पूजा चव्हाण या विद्यार्थिनी प्रथम आलेल्या आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री राजेश टोपे, मनिषा टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. सुनील खांडेभराड, अधीक्षक शिवराज लाखे यांच्यासह आदींनी अभिनंदन केले.

ज्ञानसागर कनिष्ठ महाविद्यालय
जाफराबाद । येथील ज्ञानसागर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल ९८ टक्के लागला असुन गतवर्षी तुलनेत याही वर्षी महाविद्यालयाने उज्जवल यशाची परंपरा कायम राखली. या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष सुरेश दिवटे, बी. के. जाधव, प्राचार्य एन. टी. दिवटे, प्राचार्य विलास नवले, शालिनी बकाल, प्रा.आप्पासाहेब दिवटे, प्रा. एन. टी. वायाळ, प्रा. आर. एन. शेळके, प्रा. एन. डी. वायाळ, प्रा. एस. ए. सोनोने, प्रा. के. ए. चिचोंले, प्रा. के. बी. घोडके, प्रा.पांडुरंग राऊत, प्रा.अजीत म्हस्के आदींनी अभिनंदन केले.

जिजामाता कॉलेज
जाफराबाद । तालुक्यातील निमखेडा खुर्द येथील जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयने याही वर्षी आपल्या निकालाची परंपरा कायम राखली या वर्षी जिजामाता उच्चमाध्यमिक विद्यालयने एकूण ३२ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी ३०विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १५विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. १३ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आले. या निकालाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला ढवळे, डॉ. प्रा. रावसाहेब ढवळे, प्राचार्य जी. एन. जाधव, प्रा. अचलखांब आदींनी अभिनंदन केले आहे.

व्हीएसएस कॉलेज
जालना । येथील व्हीएसएस महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत सलग सहाव्या वर्षी शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. विज्ञान शाखेतून मिनाक्षी नामदेव कोल्हे ९६.३३, द्वितीय आकांक्षा संतोष जळके ९१.१६ तृतीय ऋतुजा गायकवाड ९०.८३ यांनी यश मिळवले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष भाऊसाहेब मदन, डॉ. शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. प्रसाद मदन, उपप्राचार्या प्रा. सोनाली राठोड, प्रा. श्वेता पटवारी, प्रा. पुजा जाधव, प्रा. वैशाली खरात, प्रा. शाहुल छडीदार, प्रा. रूबीना पठाण, प्रा. बी. डी. तोतरे आदींनी अभिनंदन केले आहे.

संत ज्ञानेश्वर महाविद्यालय
हसनाबाद । येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून भूमिका देवलाल आकोदे ९०.३३, योगिता पवार ९०.१६ तर विकी पाटील याने ८९.८३ टक्के गुण घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, निर्मला दानवे, आशा पांडे, गणेश फुके, मंगल धुपे, दिलीप शहागडकर, अनिल साबळे, सिद्धेश्वर काळूसे, सतीश सातव, प्राचार्य माणिक दानवे आदींनी अभिनंदन केले आहे.

जेईएस महाविद्यालय
जालना । येथील जेईएस महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल ९५.२१ टक्के, वाणिज्य शाखा ९१.०४ टक्के, तर कला शाखेचा निकाल ६७.३६, एमसीव्हीसी शाखेचा ७४.२८ टक्के लागला असून विज्ञान शाखेतून ३६ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह, वाणिज्य शाखेतून ९५ विद्यार्थी विशेष प्राविन्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून सर्व प्रथम प्रथा नितीनकुमार अग्रवाल, द्वितीय प्रेम उमेश ठक्कर, तृतीय दिशा कुलकर्णी, वाणिज्य शाखेतून प्रथम वरद जुगलकिशोर सोमाणी, द्वितीय पिंकल मनीष अग्रवाल, तृतीय साक्षी अरविंद अंकमवर, कला शाखेत प्रथम तेजस्वीनी राऊत, द्वितीय नेहा जावळे, तृतीय माधुरी काजळे यश मिळवले. यशस्वी विद्यार्थांचे जेईएसचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडीया, सचिव श्रीनिवास भक्कड, उपाध्यक्ष फुलचंद भक्कड, हेमेन्द्र लखोटिया, पन्नालाल बगडीया, प्रशासकीय अधिकारी डॉ.जवाहर काबरा, प्रभारी प्राचार्य डॉ.एस.बी बजाज, प्रवीण बाफना, के. के. वासनिक आदींनी अभिनंदन केले आहे.

टोपे कनिष्ठ महाविद्यालय
जालना । येथील अंकुशराव टोपे कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ८८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.४० टक्के तर एम.सी.व्ही.सी. शाखेचा ९६.७७, तर विज्ञान शाखेचा ९८.८० टक्के निकाल लागला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेश टोपे, मनिषा टोपे, प्रशासकीय अधिकारी, डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस, उपप्राचार्य, प्रा. डॉ. संजय पाटील, उपप्राचार्य प्रा. रमेश भुतेकर, प्रा. डॉ. अशोक हुसे, प्रा.रामप्रसाद भालेकर, प्रा.डॉ. संजय शेळके आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...