आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धरणातून प्रवास करण्यासाठी ग्रामस्थांना होडीचा आधार ; अनेक गावांचा संपर्क तुटला

टेंभूर्णी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगावराजा तालुक्यांमध्ये टाकरखेडा येथे खडकपूर्णा प्रकल्प उभारला असल्याने जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांची संपर्क बॅकवॉटरमुळे तुटला आहे. जुळे गावे असलेल्या आळंद - हनुमंतखेडा, कुंभारझरी - ब्रह्मपुरी या गावांचा संपर्क तुटला आहे. बाराही महिने पूर्णा नदी पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने नदीतून होणारी ये जा बंद झाली. पण दोन्ही गावात ये जा करण्यासाठी आधार ठरला तो होडीचा.

आळंदी येथील लिंबाजी गायकवाड या युवकाने होडीचा व्यवसाय सुरू केला. दहा रुपयात या थडीवरून त्या थडीवर ग्रामस्थांना पोहोचविण्याचे काम केले जाते. यातूनच या युवकाला रोजगार मिळाला. दोन्ही गावातील व परिसरातील नातेवाईकांना जाण्या येण्याचा हा जवळचा मार्ग आहे. आळंद नळविहीरा, खामखेडा, सावरगाव, कुंभारझरी या गावातील ग्रामस्थांचे सगेसोयरे नदी पल्याड असलेल्या हनुमंत खेडा, मंगरूळ, ब्रह्मपुरी या गावात परंतु प्रकल्प झाल्यानंतर या गावाचा जाण्या-येण्याचा संपर्क तुटला येथील ग्रामस्थांना वीस ते पंचवीस किलोमीटरचा फेरा मारून सगेसोयऱ्यांना भेटीसाठी सुखदुःखासाठी जावे लागत.

हीच बाब ओळखून लिंबाजी गायकवाड याने होडीचा व्यवसाय सुरू केला. दररोज जवळपास दीडशे ग्रामस्थ या होडीतून ये जा करतात असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे होडीतून दुचाकीही नेल्या जात असल्याने या या होडीतून अनेक जण प्रवास करतात. या ठिकाणी पूल होणे शक्य नसल्याने भविष्यातही जाण्या येण्यासाठी होडीचाच मोठ्या प्रमाणावर वापर होणार आळंदसह कुंभारझरी येथूनही परिसरात जाण्यासाठी होडीची सुविधा उपलब्ध आहे.

दरम्यान, आळंदगावासह परिसरातील ग्रामस्थांचे सगळे सोयरे नदी पल्याड असलेल्या ब्रह्मपुरी, हनुमंत खेडा या गावात आहेत. परंतु बॅकवॉटरमुळे पूर्णा नदी तुडुंब पाणी असल्याने २५ किलोमीटरचा फेरा मारून या गावाला जावे लागत होते. यामुळे आपण तराफा तयार करून ग्रामस्थांना पाण्यातून जाण्या येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे परिसरातील नागरिकांचा वेळेची व पैशाची बचत होऊ लागली आणि आपल्याला रोजगार उपलब्ध झाला असल्याचे होडीचालक लिंबाजी गायकवाड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...