आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:भोकरदन-जालना मार्गावर आढळला अलापूरच्या चालक तरुणाचा मृतदेह; मृतकाला बेदम करून दगडाने ठेचला चेहरा, घातपात असल्याची शक्यता

फत्तेपुर / सुरेश शेळके2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन-जालना महामार्गालगत असलेल्या शेतात आज दि.19 शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान एका वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. भगवान राजू तळेकर वय 20 वर्ष रा.उस्मानपेठ भोकरदन असे मृत तरुणांचे नाव आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सदरील प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी नऊच्या दरम्यान भोकरदन जालना मार्गावर एक अनोळखी मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर पोलिसांचा ताफा घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्यावेळी मृतकाची ओळख पटत नसल्याने तेथून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता. मृतकाची ओळख न पटावी याकरिता अज्ञात आरोपींनी चेहऱ्यावर मोठ्या शस्त्र किंवा दगडाचा वापर झालेला असावा? तर मृतदेह दिसून येऊ नये या करिता मृतदेहावर कापाशीच्या पळाट्याच्या गंजी टाकल्या होत्या तर घटनास्थळी मृतकला बेदम मारून डोख्यात दगड घालून कोणी अज्ञातांनी या ठिकाणी आणून मृतदेह आणून टाकल्याचे समजत आहे.

आता याप्रकरणी पोलिसांसमोर आरोपी तपासण्यासाठी एक आवाहन असणार आहे. यावेळी सा.पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड सोबत सा. पो.नी. राजाराम तडवी पो.ना गणेश पायघन. पो.कॉ.अभिजित वायकोस आय बाईक पथक मध्ये शेख आसेफ तर दीपक इंगळे समाधान जगताप रामेश्वर सिनकर ईतर कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर तरुणाच्या खिशात असलेल्या आधार व लायसन्समुळे तो भोकरदन मधील उस्मानपेठ आलापूर मधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून मृतदेहाची शवविच्छेदन प्रक्रिया डॉक्टर करत असून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...