आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवाशी खेळ:हसनाबाद परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; नागरिकांच्या जिवाशी खेळ

हसनाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेले बोगस डॉक्टर निरक्षर व गोरगरीब पीडीत रुग्णांवर उपचार करीत आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

हसनाबाद परिसरातील विटा, सावखेडा, पिंपळगाव, गोषेगाव, वजिरखेडा, निमगाव, खंडाळा, रजाळा, पंढरपूर, लतिफपूर, खादगाव पिंपरी, तळेगाव, एकेफळ, सिरसगाव मंडप, सिरसगाव वाघ्रळ, बोरगाव या गावांमध्ये कोणती वैद्यकीय पदवी नसलेले किंवा कोणताही परवाना नसलेले हे मुन्नाभाई आपल्या बॅगा घेऊन आजूबाजूच्या शहरातून खेडेगावात येऊन रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत. रुग्णांना सलाईन लावणे, जखमेवर टाचे देणे, इंजेक्शन देणे असे उपचार बिनधास्तपणे करीत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...