आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्व जयंत्या जातीपातीनुसार साज-या न करता सर्वांनी एकञितपणे साज-या करुन जात पात विरहित सर्व हिंदु समाज एकाच झेंड्याखाली आणण्याचे काम ब्राह्मण समाजातील युवकांनी करावे, असे आवाहन सेलू येथील योगेश महाराज साळेगावकर यांनी केले.
परशुराम जन्मोत्सवानिमित्त अंबड येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार नारायण कुचे, केदार कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. ज्वलंत हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते व अध्यात्म किर्तन सेवेतुन अनेक शिष्योत्तम घडविणारे योगेश महाराज साळेगावकर यांनी ब्राह्मणत्व म्हणजे काय व ते कसे राखावे ञिकाल संध्या, उपासना सद्ग्रंथ वाचन व नामस्मरणाचे महत्व पटवून दिले. ब्राह्मण हाच खरा भारताचा आधार असून सर्वमंञ ज्या ब्राह्मणाधीन आहेत त्या मंञाचे महत्व राजकारणी लोकांना कळु शकणार नाही असे सांगून अमोल मिटकरी यांच्या विधानाचा समाचार घेतला.
पाकिस्तानची निर्मिती करणारे व देशाचे नुकसान करणारे गांधीजी आपल्याला सांगितले गेले परंतु या देशावर खरे प्रेम करणारे व प्राण देणारे सावरकर, वासुदेव बाळवंत फडके, झाशीची राणी, बाजीप्रभु देशपांडे सांगितले नाहीत. शिवराज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राह्मण सांगताना काशीचे गागाभट्ट ही ब्राह्मणच होते हे साळेगावकर महाराजांनी अधोरेखीत केले असे सांगून केवळ ब्राह्मणावर टिका करण्यातच धन्यता मानणाऱ्या राजकीय नेत्यांना सुनावले. खरे तर सर्वात जास्त टिका होणारा ब्राह्मण समाज याही बाबतीत वरचढच आहे. आज आधुनिक तंञज्ञानाच्या शिक्षणा बरोबर शस्ञाचेही शिक्षण देणे गरजेचे आहे.
सर्वच जातीमध्ये संत झालेले असताना केलळ त्याच त्याच जातीच्या लोकांनी जयंती साजरी करने गैर आहे. संघटन वृत्तीसह मिठाशी इमान राखण्याचा मंञ सांगितला. भारत मातेच्या सेवेसाठी तरुणांनी केवळ अभियंता व डॉक्टरच व्हावे असे काही नाही तर आपापल्या अंगी असणाऱ्या कलेनुसार या देशाची प्रामाणिकपणे सेवा करने हाच खरा धर्म आहे. संत साहित्य, रामायण, महाभारत, दासबोध व ज्ञानेश्वरीसह मनाचे श्लोक आणि नित्य हरीपाठानेच खरा माणुस घडविला जाईल, असे सांगितले. प्रारंभी भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्यावतीने साळेगावकर महाराजांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन गजानन देशमुख यांनी तर अमीत कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी शहर आणि परिसरातील समाजबांधवासह इतरांचीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ब्रम्हवृदांनी शांतीपाठ सादर केला. या कार्यक्रमासाठी मागील पंधरा दिवसापासून समितीचे अमित कुलकर्णी, रोहन महाजन, गजानन देशमुख, हरीष वाघमारे, वरद नाईक, प्रणीत देशमुख, निलय जपे यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, शोभायात्रेचे शहरातील प्रमुख मार्गावर पालकमंत्री राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, युवा सेनेचे विनायक चोथे, संदीप खरात, शिवप्रसाद चांगले, अमोल वराडे, बाबासाहेब इंगळे, बाबुराव खरात, राजेंद्र डहाळे आदींनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी शहरातील समाजबांधव, महिला, बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.