आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचालू अथवा थकीत वीज बिलासाठी शेतकऱ्याच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करू नका ,असे लेखी पत्रच महावितरण चे देयके व महसूल विभागाचे मुख्य अभियंता यांनी महावितरणच्या सर्व मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता दहा रोजी पाठवले आहे. यामुळे आता रब्बी हंगामाच्या तोंडी रोहित्राचा पुरवठा बंद करण्याच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे.
भोकरदन तालुक्यासह सर्वत्र महावितरण कडून थकीत वीज बिलापोटी व चालू विज बिल बाकी वसुली करण्यासाठी ऐन रब्बीच्या हंगामात विज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली होती. यामुळे विहिरीत पाणी असून सुद्धा रब्बी हंगामात पेरलेल्या गहू, हरभरा, ज्वारी ही सर्वच पिके महावितरणच्या या मोहिमेमुळे संकटात आली होती. ही सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी यासाठी सर्वच पक्षांच्या वतीने आंदोलने करून निवेदनही देण्यात आली होती.
त्यानंतर १० डिसेंबर रोजी महावितरण चे देयके व महसूल विभागाचे मुख्य अभियंता यांच्या स्वाक्षरीनिशी महावितरण विभागाच्या सर्व कार्यालयांना एक पत्र जारी त्यांनी केली त्यात थकीत वीज बिल वसुली व चालू विज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करू नये असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे विज बिल कनेक्शन कोट होणार नाही. यासंदर्भात भोकरदन चे महावितरण चे कार्यकारी अभियंता तुरे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते रजेवर गेलेले आहेत तर त्यांचा प्रभारी असलेले दारकोंडे हे देखील उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र, आता भोकरदन तालुक्यात सुरू असलेली वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी व ज्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केलेले आहेत किंवा रोहित्र बंद करून सर्व वीज कनेक्शन बंद केले आहे ते त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेकडो एकरांवरील पिकांना दिलासा
यावर्षीच्या रब्बी हंगामाला परतीच्या पावसाचे पाठबळ मिळाले आहे. यामुळे यंदा रब्बी हंगामात गहू, हरभरा, शाळू ज्वारीचे प्रमाण अधिक झाले आहे. परतीचा पाऊस रब्बीच्या सुरूवातीलाही बरसल्याने त्याच्या ओलाव्यावर जिरायती क्षेत्रावरही वाढ झाली आहे. यात ज्वारीच्या पेऱ्याचे प्रमाण यंदा वाढले आहे. कमी पाण्यावरही ही पिके येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.