आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्दैवी:कंपाउंड तोडून भरधाव कंटेनर घुसला अंगणात, सख्ख्या बहिणींना चिरडले; जालना-सिंदखेडराजा रोडवर घटना

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूरहून बांबू घेऊन सोलापूरला जात होता कंटेनर; चालक, क्लीनर फरार

बांबू घेऊन भरधाव वेगाने येणारा कंटेनर रोडला लागून असलेल्या घराच्या ६० फूट अंतरावरील अंगणात घुसला आणि तेथे उभ्या असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना चिरडले. ही घटना जालना-सिंदखेडराजा रोडवरील नाव्हा या गावाजवळ बुधवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. अचानक आलेल्या आवाजामुळे घरातील महिलांनी बाहेर येऊन पाहताच टाहो फोडला. घरात कुणी पुरुष मंडळी नसल्याने चालक व क्लीनर पळून गेले. छाबडी सलीम शेख (६), सायली सलीम शेख (७) अशी मृत मुलींची नावे आहेत.

जालना तालुक्यातील धारकल्याण येथील सख्ख्या बहिणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता आईसह नाव्हा येथे मामाच्या गावी आल्या होत्या. दरम्यान, दुपारच्या वेळी त्या घराबाहेर अंगणात खेळत होत्या. परंतु, याच वेळी सिंदखेडराजाकडून येणारा कंटेनर घरासमोरील लोखंडी जाळी तोडून थेट अंगणात घुसला. या कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दोघींचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, सदर बाजार ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील गर्दी कमी करून जमाव पांगवला. दोन्ही मुलींचे मृतदेह टायरखालून काढत असताना नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, शुक्ला ट्रान्सपोर्टचे दिलीप शुक्ला म्हणाले की, दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. चालकाशी अजून संपर्क झाला नाही.

वळण रस्त्याची जागा ब्लॅक स्पॉट

सिंदखेडराजाकडे जाणाऱ्या सावरगाव डोंगरगावजवळील हा डोंगर आहे. सिंदखेडकडून येणारी वाहने एकदम वेगात येतात. यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात होतात. यात आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. यामुळे ही जागा ब्लॅक स्पॉट ठरलेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाहनाने हुलकावणी दिली असावी

एखाद्या वाहनाने हुलकावणी दिली असावी, अथवा चालक मद्य प्राशन केलेला असावा, किंवा डुलकी लागल्यामुळे रोड सोडून हा भरधाव कंटेनर रोडच्या कडेला गेला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत मुलींचे वडील रुग्णालयाच्या भिंतीला डोके ठेवून झाले होते खिन्न

कंटेनरच्या (एनएल ०२ के ८४६२) अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच धारकल्याण, नाव्हा गावावर शोककळाच पसरली. घटनास्थळी असलेल्या महिलांच्या आक्रोशामुळे परिसर खिन्न झाला. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मुलींच्या वडिलांना मिळताच ते पोस्टमाॅर्टेमच्या ठिकाणी आले. परंतु, या ठिकाणी त्यांना राहावले गेले नाही, रुग्णालयाच्या भिंतीला डोके ठेवून ते एकसारखे रडत होते. त्यांच्या आवाजामुळे इतर नातेवाईक व गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गावातील एका जणाने येऊन त्यांना दुचाकीवरून गावाकडे समजूत घालत नेले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser