आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा यश:ब्राइट स्टार इंग्लिश स्कूलचे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये यश

परतूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना येथील भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत परतूर येथील ब्राइट स्टार इंग्लिश स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी साई अजय कांबळे याने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. या निवडीबद्दल माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, नगरसेवक बाबुराव हिवाळे, राजेश भुजबळ, राजेश खंडेलवाल, शेख शब्बीर, भालेराव, मुख्याध्यापक शंकर खनके यांच्यासह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...