आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभर उन्हाळ्यात पावसाळ्यापेक्षाही जास्त पाऊस पडत असल्याने शेतकरी तर वैतागून गेले आहेत. शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. आता शेतकऱ्यासोबत व्यापारी वर्गातही संभ्रमाचे वातावरण आहे.
उन्हाळा आहे म्हणून कुलर विकायला आणले तर आता पाऊस पडत असल्याने ग्राहक छत्र्या मागत आहेत. छत्र्या आणल्या तर कडक ऊन पडत आहे. त्यामुळे छत्र्या विकाव्यात की कुलर विकायला आणावेत हेच समजत नाही. हवामानातील बदलामुळे सर्वत्र गोंधळात गोंधळासारखे वातावरण आहे.
आता पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या वातावरणाचा समतोल बिघडला आहे. कडक उन्हाळा सुरू असताना पावसाळ्यापेक्षाही जास्त जोराने पाऊस येत आहे. अवकाळी पाऊस सोबत वादळी वाऱ्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने मका, बाजरी, कांदा, कांदा सिडस्, मिर्ची आदी पिके उद्वस्त झाले आहेत. हाता तोंडाला घास हिराऊन गेला अवकाळीच्या संकटाचे आता सरकारकडून सर्वेक्षण होईल पाहणी होईल त्यानंतर नुकसान भरपाई काय मिळेल ती मिळेल, मिळेल की नाही हा सुद्धा प्रश्नच आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची अपेक्षा आहे. एकीकडे शेतकरी उध्वस्त झाला आहे तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची हीच परिस्थिती आहे. लग्न सराई मध्ये पावसाने धूमाकूळ घातल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. कुलर , फ्रीज, रेफ्रिजरेटर, एसी यासाठीचा सीजन असलेला उन्हाळा सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी सर्व शोरूम फुल केले होते. उन्हाळा सुरू होताच ग्राहक वाढतील व गेल्या दोन वर्षापासून ठप्प पडलेली दुकानदारी सुरू होईल व नुकसान भरून निघेल अशी आशा होती.
मात्र आता भर उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाला आहे. कुलरच्या दिवसात छत्र्या मागण्यासाठी ग्राहक येत आहे. छत्री, रेनकोट ठेवण्याची वेळ आता व्यापाऱ्यावर आली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काही व्यापाऱ्यांनी छत्र्या रेनकोट ही आणून पाहिले मात्र त्यानंतर कडक ऊन पडणे सुरू झाल्याने छत्र्या रेनकोटचे ग्राहक गायब झाले होते.
त्यामुळे पुन्हा कुलर, पंखे यांच्या खरेदीवर भर देऊन ग्राहकांना आकर्षक करण्यास सुरू केले असता आता पुन्हा जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे व्यापारीही चक्राऊन गेला आहे. बाजारातील ग्राहक मंदावले आहेत. बाजारपेठेवर परिणाम होत आहे. खर्च वाढला आणि ग्राहक कमी अशी अवस्था बदलामुळे झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.