आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमात-ए-इस्लामी कार्यालय दु:खी नगर जालना येथे नुकतीच एमात ए इस्लामी हिंद जालना ची बैठक घेण्यात आली. यामध्ये न्यायप्रिय, शांतता प्रिय आणि मानवताप्रिय विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनाशी जुडलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या विषयावर चर्चा केली. यावेळी सर्वानुमते “सद्भावना मंच’ची स्थापना करण्यात आली. भाईचारा अन सामाजिक सलोखा ही काळाजी गरज असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.
सदभावना मंच हा समाजातील विविध घटाकंवर काम करणार आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने सांप्रदायिक सद् भावना आणि शांतता व सौहार्दाचे वातावरण कायम ठेवणे त्यात वृद्धी करणे. विविध धार्मिक व सामाजिक नागरिकांमध्ये धर्म, श्रद्धा, विचारधारांबद्दल आदर व सन्मान व एकमेकांच्या अधिकाराबद्दल जागृती निर्माण करणे. समाजातील मानवी मूल्य व सामूहिक संस्कार यांचा आदर करणे आदी बाबीचा ठराव यावेळी घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात आपसातील परिचयाने झाली त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना शेख रशीद सचिव भारतीय समाज यांनी प्रस्तावनेत सांगितले की, सामाजिक सलोखा ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रफिक पारनेरकर ज्येष्ठ समाजसेवक अध्यक्ष भारतीय समाज महाराष्ट्र यांनी सद् भावना मंचचा उद्देश व त्याचे कार्य याबद्दल माहिती देताना सांगितले की सद्भावना चे कार्य हे सुरुवातीपासूनच होत आहे.
परंतु यामध्ये वाढ कशी करता येईल यासाठी समाजातील विविध जाती धर्मातील न्यायप्रिय लोकांनी एकत्र येऊन संविधानाच्या आधीन राहून लोकशाही मार्गाने यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे तरच सद् भावना च्या माध्यमातून आपल्या समाजाला पुढे नेता येईल, आदर्श समाज घडवता येईल हे सर्वांच्या हिताचे आहे. यावेळी चंद्रमणी गाडेकर, मौलाना सोहेल नदवी, नारायण भुजंग, बोर्डे, डॉक्टर निर्मल, सुशील वाघमारे, प्रमोद खरात, हाफीज सोहेल मोहम्मदी, संजीव कसबे यांनी यावेळी आपली मते मांडली. उपस्थित मान्यवरांच्या सहमतीने ‘सद्भावना मंच’ जालना चा ठराव एक मताने पास करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्ते यांनी आपले हात वर करून लोकतांत्रिक पद्धतीने ठराव पास केला. सूत्रसंचालन सय्यद शाकीर यांनी केले. आभार प्रदर्शन शेख इस्माईल शहराध्यक्ष यांनी केले.
सद्भावना मंच’ संचालक मंडळ असे : शेख रशीद (समन्वयक) प्रमोद बी. खरात, संजीव कसबे, सुनील कोरे, अॅड. अनिल मिसाळ, सुशील कुमार वाघमारे, नारायण भुजंग,, प्राध्यापक खालील खलीफा, मौलाना सोहेल नदवी, सिद्धार्थ पवार, मोहम्मद इफ्त़ेकारोद्दीन, चंद्रमणी गाडेकर, हाफीज सोहेल मोहम्मदी , डॉक्टर एस. पी. निर्मल, अण्णाा सांवत, संजय लकडे, रावसाहेब ढवळे, महंत जीवनदासजी महाराज, डॉ. जैस्वाल, शेख अहमद अ.कू्ददुस कुरेशी आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची संचालक मंडळ पदी नियुक्ती करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.