आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:जाफराबाद शहरातील बीएसएनएल सेवा कोलमडली; कामकाज ठप्प

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बीएसएनएल रेंजच्या सततच्या लंपडावाने नागरीक तथा शासकिय कर्मचारी कमालीचे वैतागले असुन ही सतत होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.शासनाने जवळपास सर्व कार्यालये, व्यवहार ऑनलाइन प्रणालीत जोडण्याचा सपाटा सुरु केलेला आहे. त्यामुळे घंट्याचे काम मिनिटात जरी होत असते तरी मात्र शासनाच्याच बीएसएनएल रेंजच्या सततच्या लंपडावाने ग्राहक कमालीचे वैतागले असुन सर्वच कामकाज इंटरनेटच्या रेंज अभावी खोळंबत आहे. शेतीच्या मशागतीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना आपले कामे सोडून क्षणभर देखील वेळ नाही मात्र विविध कर्ज प्रकरणे, बँकांचे कामे, खरेदी विक्री व्यवहार, तहसिल, पंचायत समिती, विविध साेसायट्या, पोष्ट ऑफीस, कृषी कार्यालय तथा इतरही शासकिय तथा निमशासकीय कार्यालयामंध्ये बीएसएनएलची इंटरनेटसाठी सुरळीत रेंज नसते.

याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जेव्हा पासुन बीएसएनएल कंपनीने मोबाईल कार्ड सेवा उपलब्ध केली तेव्हा पासुन आमचा परीवार त्यांचे मोबाईल सिम तथा इंटरनेटचे ग्राहक आहोत. गत काही दिवसापुर्वी शहराअतर्गत रोडचे काम सुरु असल्याने बीएसएनएल सेवा अनेक दिवस खंडीत होती. मागील आठवडयापासून रेंजची समस्या उद्भवत असुन ही समस्या वरिष्ठांनी लक्ष देऊन दुर करावी अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला सिमसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असा इशारा डाॅ. सतिष शिंदे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...