आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुद्धिस्ट म्हणजेच धम्माचे आचरण करणे आणि हाच खरा धम्म आहे, असे थायलंड येथील पूज्य भदंत श्रवण अशोक (हिंदी चित्रपट अभिनेते) यांनी सोमवारी येथे धम्मदेसना देताना सांगितले.
संबोधी अकादमी महाराष्ट्रच्या वतीने संपूर्ण भारतात आयोजित धम्मयात्रा बुद्धगया ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव महू (मध्य प्रदेश) आणि महाराष्ट्रात चैत्यभूमी ते दीक्षाभूमी धम्मयात्रेतील थायलंड येथील भिक्खू संघाचे सोमवारी जालना येथे आगमन झाले होते. याप्रसंगी जालना शहरातील बौद्ध उपासकांच्या वतीने भिक्खू संघाचे शासकीय विश्रामगृहात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी धम्मदेसना देतांना पूज्य भदंत श्रवण अशोक बोलत होते. या वेळी थायलंड येथील पुज्य भदंत प्रमहा बोधिनहमुनी, पुज्य भदन्त वेण फ्रक्रूशीला खुणसमोतरं, पुज्य भदन्त वेण फ्रविणयसुती, पुज्य भंते अणेक, पुज्य भंते वेण रत्नेश्वर चकमा, पुज्य भंते फ्रामहा बनजोंग अर्थिजवानसो, पुज्य भंते फ्रामाहा सिरिचाई यानानवत्तानो, यांच्यासह कॅप्टन नत्ताकिट (थायलंड) यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना पुज्य भदन्त श्रवण अशोक म्हणाले की, हे एक आव्हान आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण करण्याचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते संपूर्ण भारत बौद्धमय करेल. भारत बौद्धमय करण्याची वेळ आलीय. जे धम्मचक्र त्यांनी चालविले होते त्याची गती थांबलीय अथवा मंद झालीय. ही गती वाढविण्यासाठी आम्ही एक धम्मयात्रा काढलीय. आपल्यासोबत थायलंड येथील बौद्ध भिक्खु आहेत. आम्ही संपूर्ण भारतात तथागत गौतम बुद्धांच्या ८४ हजार मूर्त्यांचे वाटप करणार आहोत. या मुर्त्या वाटप केल्यानंतर घरा घरात बौद्ध धम्म पोहोचेल. बुद्धांचा धम्म हा असा धम्म आहे जो धर्मांतर करून किंवा भांडण तंटे करीत नाही, तर सर्वाना जोडण्याचे काम करतो. तुम्ही तुमच्या जीवनात धम्माचे आचरण केल्यास तुम्ही निश्चित चांगले व्यक्ती व्हाल. आपल्या येथील बौद्ध समाजात एकतेची कमतरता आहे, जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्याला मागे खेचण्याचे काम होते, बुद्ध धम्माचा प्रसार न होण्यास बौद्ध धर्मीयच जबाबदार आहेत, अशी खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, आता वेळ आलीय हातात हात घेऊन, खांद्याला खांदा देऊन बुद्ध धम्म प्रसाराचे काम करावे लागेल. याप्रसंगी बौद्ध उपासक प्रकाश गडवे, अंकुश नाकलगावकर, डी. आर हिवराळे, गौतम वावळे, दिनकर घेवंदे, सुबोधकुमार जाधव, नागसेन बनकर, बबन पव्हरे, हिमतराव म्हस्के, भारत खंडारे, प्रभाकर घेवंदे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.