आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जडणघडण:किल्ले बनवा स्पर्धेत तरमाळे, काळेची बाजी ; विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मिळाला वाव

तीर्थपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, तसेच त्यांच्यातील आकलन शक्तीचे प्रगटीकरन होऊन देशाच्या जडणघडणमध्ये विद्यार्थी दशेतच त्यांना रुची निर्माण व्हावी म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे सोशल मीडिया प्रमुख अरविंद धांडे व ज्ञानेश्वर घोगरे यांच्या नियोजनातून किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवशाहीर अरविंद घोगरे, समाज भान टीमचे दादासाहेब थेटे, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा युवा शेतकरी संघर्ष समितीचे ज्ञानेश्वर उढाण, गणेश पघळ, पुरुषोत्तम उढाण, सुदर्शन राऊत यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी किल्ल्यांचे निरीक्षण करून बक्षीसास पात्र असलेली तीन स्पर्धक निवडले त्यात प्रथम क्रमांक कार्तिक ईश्वर तरमाळे या विद्यार्थ्याने तर आरती लक्ष्मण काळे हिने द्वितीय, आर्यन विनोद जोशी याने तृतीय क्रमांक पटकावला. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने विजयी स्पर्धकांना सन्मानपत्र व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी गावचे उपसंरपंच शिवाजी भोजणे, विश्वास भालेकर, प्रल्हाद भालेकर, दत्ता भालेकर, प्रविण भोजणे, शरद केदारे, आदित्य भालेकर, आशोक भोजणे, भास्कर भोजणे, कृष्णा भालेकर, विलास केदारे, रवी बोबडे, शिवराज केदारे, नरहारी हिवाळे, पाडू मोटे, आनिल केदारे, आभिषेक भालेकर, दत्ता कबले, रवी पवार, माऊली धांडे, योगेश भालेकर, विकास भालेकर, आविनाश भालेकर, विकास भालेकर, कृष्णा राऊत आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...