आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहे बांधा:जालन्यात स्वच्छतागृहे बांधा, पेट्रोल पंपावर सुविधा द्या

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधा तसेच पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहे सुव्यवस्थित करण्याची मागणी सर्वधर्म समभाव संघर्ष ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे गुरुवारी करण्यात आली.

नुकतीच डॉ. राधेश्याम जैस्वाल व इतर ज्येष्ठ नागरिकांनी जालन्यात पूर्वीप्रमाणे स्वच्छतागृहे निर्माण करण्यासाठी विनंती केली असून त्यानुषंगाने स्वच्छतागृहे बांधावीत. ऑटो रिक्षाचालक २४ तास जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना घेऊन जावे लागते, यामुळे ही अतिदक्ष अशी सेवा आहे.

यादरम्यान ऑटो चालकांसाठी कुठेही स्वच्छतागृह उपलब्ध होत नसल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. तसेच पेट्रोलपंपांवर असलेली स्वच्छतागृहे एक तर बंद असतात किंवा वापरण्यायोग्य नाही, यामुळे ऑटोचालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन त्वरीत स्वच्छतागृहे बांधावीत तसेच पेट्रोलपंपांवरील स्वच्छतागृहे व्यवस्थित होईल, याकडे लक्ष देण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी दिलीप कोसंदल, रंजित सावजी, वामन कदम, संजू काेमटवार, गोपी माेहिते, रिजवान शेख, सुभाषराव पायदाणे, संजय राऊत, विठ्ठल शिंदे आदींची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...