आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात शुक्रवारी दुपारी विजेच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. या दरम्यान वीज पडून २ बैल, १ गाय दगावली असून वळईला आग लागून १ हजार कडबा पेंढी जळून खाक झाली. सेलू नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीने तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न करून घटनास्थळी मदन आवटे व भारत आवटे या शेतकऱ्यांच्या ५ हजार कडब्याच्या पेंढ्या आगीपासून वाचण्यात आल्या.
सेलू शहरासह तालुक्यात शुक्रवारी अचानक सुसाट वारे सुरू झाले.त्यात विजेचा कडकडाटात झालेल्या पावसात रवळगाव येथे कामावरील गडी दत्तात्रय फुलपगारे यांनी लिंबाच्या झाडाखाली रमेश रोडगे यांनी बांधलेल्या बैलजोडीच्या ठिकाणी विज पडली. यामध्ये एक बैल ठार झाला. तर दुसऱ्या घटनेत खादगाव येथील परमेश्वर भाबड यांच्या बैलावर वीज पडून बैल जागीच दगावला आहे.
तिसऱ्या घटनेत माळसापुर येथे मदन आवटे यांच्या कडब्याच्या वळईवर वीज पडल्याने जवळपास १ हजार कडबा जळून खाक झाला.तर चौथ्या घटनेत डिग्रस खु येथे विज पडून दत्तात्रय नानाभाऊ शेरे यांची गाय दगावली. खरीप पेरणी च्या पूर्वसंध्येला शुक्रवारी झालेल्या पावसामुळे विज पडून २ बैल व १ गाय , कडबा जळाल्याने या नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचे २लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सेलू शहरातील उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांचे बसस्थानक परिसरातील शासकीय निवासस्थान मधील लिंबाचे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. याशिवाय तालुक्यातील केळी व फळबाग व भाजीपाल्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.