आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शिराळयात पुन्हा तुटली बैलाची जीभ; शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

सेलू5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू तालुक्यातील शिराळा येथील शेतकरी भागवत हरिभाऊ वायगुंडे यांच्या बैलाची २० नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास जिभ तुटून पडल्याची घटना पुन्हा घडली. या प्रकरणी शिराळा येथील ग्रामस्थांनी सोमवारी तहसीलदार दिनेश झांपले यांना प्रत्यक्ष भेटून घडल्या प्रकाराविषयी माहिती दिली.

आतापर्यंत शिराळा यागावी बैलाची जीभ तुटून तुटण्याची आजची तेरावी घटना आहे. यापूर्वी जीभ तुटल्यामुळे ११ जनावराचा तडफडून मृत्यू झाला होता. दोन बैल गंभीर जखमी झाले आहेत. विशेष वैद्यकीय पथकामार्फत या घटना स्थळाची भेट घेऊन पाहणी करून ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाची आर्थिक नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी कठोर उपाय योजना करावी ११ बैलाच्या मृत्यूनंतर बाराव्या बैलाची अशाच प्रकारे जीप तुटल्यामुळे हा घातपाताचा प्रकार तर नाही ना म्हणून बाराव्या बैलाची जीभ तुटल्यानंतर संबंधित पशु मालकाने अज्ञात आरोपीच्या विरुद्ध सेलु पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता.

परंतु हा प्रकार २० नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता घडल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी शिराळा येथील ग्रामस्थ गुलाब बापूराव खेडेकर,उद्धव नबाजीराव खेडेकर, भागवत हरिभाऊ वायगुंडे, सोनाजी मारोती वायगुंडे,मळीभाऊ न्यानोबा खेडेकर, बाबासाहेब तुळशीदास खेडेकर, उद्धव वामन खेडेकर, ज्ञानेश्वर लक्ष्मण शेजुळ,माऊली देविदास शिंदे,श्याम हरिभाऊ वायगुंडे, आदींनी तहसिलदारांनी थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

बातम्या आणखी आहेत...