आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानक ब्युरो:मत्स्योदरी विद्यालयात भारतीय मानक ब्युरो

अंबड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील भारतीय मानक ब्यूरो आणि सायन्स सेंटर बारामती तिच्या संयुक्त विद्यमाने सूर्यकांत मुंढे व हिना भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मत्स्योदरी विद्यालय येथे बीआयएसचे प्रमोशन ऑफिसर हर्ष मोहन शुक्ला यांच्या हस्ते अंबड येथील मत्स्योदरी बीआयएस क्लबचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक अरविंद देव, मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या सहा शाखेतील बीआयएस क्लबचे मेंटर शिक्षक प्रकाश गुंजकर, कल्याण सोळुंके, सुरेश गव्हाणे, भगवान उगले, उमेश साळुंके, दादा खरात, वालरकर, बाप्पासाहेब उबाळे उपस्थित होते.

हर्ष शुक्ला म्हणाले, भारतीय मानक ब्यूरो ही भारत सरकारच्या अखत्यारीखालील ही संस्था २३ डिसेंबर १९८६ रोजी स्थापन झाली. ही संस्था आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते. काही दिवसात बीआयएस क्लबच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ३० घरामध्ये जाऊन कुटुंबप्रमुखाला बी आय एस केअर बद्दल माहिती देऊन त्यांना वस्तू खरेदी करतानाती गुणवत्ता पूर्ण असावी अशी सूचना द्याव्यात तसेच आयएसआय मार्क, हॉल मार्क तसेच रजिस्ट्रेशन मार्क अादी बाबत मार्गदर्शन केले.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स , राष्ट्रीय मानक संस्था, भारत सरकारच्या मानकीकरण आणि प्रमाणीकरणाच्या मुख्य क्रियाकलापांद्वारे देशात एक मजबूत गुणवत्ता पर्यावरण प्रणाली तयार करण्याच्या दिशेने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘स्टँडर्ड्स क्लब’ तयार करण्याच्या संकल्पनेची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना लहान वयातच मानकीकरण आणि गुणवत्तेच्या संकल्पनांची ओळख करून दिली जाते. स्टँडर्ड्स क्लबच्या माध्यमातून विज्ञान विद्यार्थ्यांना विद्यार्थी केंद्रित उपक्रमांद्वारे गुणवत्ता आणि मानकीकरणाच्या संकल्पनांशी ओळख करून देण्याचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...