आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:हरभऱ्याची गंजी जळून खाक; शेतकर्याचे नुकसान

मंठा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील धोंडी पिंपळगाव येथे शेतात जमा करून ठेवलेल्या हरभऱ्याच्या दोन गंजीला अज्ञाताने पेटवून दिल्यामुळे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी विजय गणेशराव सूर्य यांनी परतूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

धोंडी पिंपळगाव येथील शेतकरी विजय गणेशराव सूर्य यांनी आपल्या पाच एकरातील हरभऱ्याच्या दोन गंजी काही अंतरावर रचून ठेवल्या होत्या. परंतु रात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गंजीला आग लावून दिली. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे किमान साडेचार लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महसूल विभाग आणि विमा कंपनीने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याने याबाबतचा पीक विमा भरलेला आहे, परंतु पीक विमा कंपनीचे अधिकारी साधी पाहणी करायला देखील आले नाहीत. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतचा पंचनामा केला आहे. नुकसान भरपाईसाठी मागील दहा दिवसांपासून तहसील कार्यालयात चकरा मारीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...