आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजात सगळीकडे गर्वाचे लोन पसरत आहे. जो पहा तो गर्वाने फुगत आहे. परंतु माणसा तु तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीचा आणि सत्तेचा कितीही गर्व केला. तरी तुला सुखाची झोप कधीच लागणार नाही. यासाठी तुला तुझ्या अंगात असलेल्या रावणरुपी गर्वाचे होळीत दहन करावे लागेल. तेव्हाच कुठे तुला सुखाचा मार्ग सापडेल. अन्यथा जीवनात कायम दुःखाचा डोंगर उभा राहील, असा उपदेश ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर यांनी दिला.
भोकरदन तालुक्यातील आलापुर येथील अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनाचे पुष्प माऊली महाराजांनी गुंफले. आज या विश्वात संपत्तीच्या मोहापायी माणुस हा माणुसकीचे विसर्जन करु लागला आहे. परंतु वेळ आणि काळ हा कोणासाठीही थांबत नसुन प्रत्येकाचे दिवस बदलतात. यासाठी कुणीही आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा गर्व न बाळगता गोरगरीबांना मदत करुन धार्मिक व सामाजिक कार्यात देखील हातभार लावुन आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवली पाहीजे. आज समाजात वृद्ध मायबापाचे मोठे हाल होत असल्याचे आपण पाहत आहोत. ज्या मायबापाने औलादींच्य्या आनंदासाठी आपल्या सुखाचा कधी विचार केला नाही.
आपल्या दुखाचा कधी विचार केला नाही अशा मुलांकडून उतारवयात मोठी चुकीची वागणूक मायबापाला मिळत आहे. काहींना तर वेळेवर अन्न व पाणी देखील मिळत नसल्याने भुकेल्या पोटी त्यांचे हाल होत आहेत. परंतु ज्या घरात मायबापाचे हाल होतात त्या घरात कधीही सुख-समृद्धी लाभत नाही. त्या घरात कधीही लक्ष्मी थांबत नाही. यासाठी जीवन मंगलमय जगायचे झाल्यास मायबापाची सेवा करण्याचा करा. शिवाय जो चांगले काम करतो त्यांच्यासोबत परमेश्वर सहवास करीत असतो. जो वाईट काम करतो त्याची जागा परमेश्वर दाखवतो. यासाठी परमेश्वराचे प्रेम व आशिर्वाद हवे असेल चांगले कामे करा, इतरांना अडचणीच्या काळात मदत करा. असा सल्ला महाराजांनी दिला. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.