आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:बसला पथकांचा वेढा, खिडकीतून पळण्याचा प्रयत्न; आरोपींना कोंबडा करून केले जेरबंद, गावात गार्ड तैनात करण्यात आला होता

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलोपार्जित शेती बळकावल्याच्या कारणावरून पुतण्यानेच डोक्यात गोळ्या झाडून चुलत्याचा खून केल्याची घटना जालना तालुक्यातील मोहाडी येथे २० मार्च रोजी घडली होती. तेव्हापासून आरोपी फरार होता. अजून काही जणांचे मर्डर करणार असल्याची धमकीही आरोपीने दिली होती. तेव्हापासून या गावात गार्ड तैनात करण्यात आला होता. आरोपी फरारच असल्याने गावात भीतीचे वातावरण होते. आठ दिवस मध्य प्रदेशात राहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना बुधवारी ताब्यात घेतले आहे. दोघेही अट्टल गुन्हेगार असल्याने बसला तीन पथकांनी वेढा मारला. चौघे आत घुसून आरोपीजवळ थांबले. याप्रसंगी अटल गुन्हेगारांनी खिडकीतून बाहेर पळण्याचा प्रयत्न केला, परंतु या एलसीबी पथकांनी दोघांच्याही माना पकडून कोंबडा करत त्यांना ताब्यात घेतले. शेरा ऊर्फ रणवीर देविदास पवार व अजयसिंग नाथासिंग राठोड (दोघे रा.नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून गावठी पिस्तुलासह १२ जिवंत काडतुसे व एक खंजीर जप्त करण्यात आला आहे. मोहाडी येथील छबू घासू राठोड यांचा २० मार्च रोजी गोळी झाडून खून केला होता. याप्रकरणी सेवली ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. अजयसिंग राठोड व रणवीर पवार हे दोघे मध्य प्रदेशातील सेंधवा येथे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. त्याच वेळी शेरा ऊर्फ रणवीर पवार व अजयसिंग राठोड हे दोघे धुळे, चाळीसगाव, कन्नडमार्गे औरंगाबादकडे येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून एलसीबीच्या दोन पथकांनी वेरूळ घाटात बस थांबवून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे व खंजीर जप्त करण्यात आला. त्यांना या खुनाबाबत विचारले असता वडिलोपार्जित शेती बळकावल्याच्या कारणावरून खून केल्याची त्यांनी कबुली दिली. दोन्ही आरोपींना सेवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...