आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर धावणाऱ्या बसेस कोरोनाकाळात लॉकडाऊनचे निमित्त दाखवून बंद करण्यात आल्या. मात्र, कोरोना संपल्यानंतरही या बसेस सुरू होत नसल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा विनवण्या करून, ग्रामपंचायतचे ठराव देऊनही उत्पन्नाचे कारण देऊन बसेस सुरू केल्या नाहीत.
बसेस सुरु न झाल्यास २३ डिसेंबर रोजी जालना- बदनापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा विविध गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.बदनापूर तालुक्यातील बदनापूर ते चिकनगाव, बदनापूर ते पाचोड, अंबड ते बदनापूर, जाफराबाद ते पैठण मार्गे राजूर, चिखली, कंडारी, बदनापूर, लोणार भायगाव, जामखेड, पागीरवाडी, पाचोड ते पैठण आदी बसेस दैनंदिन सुरू होत्या. मात्र, कोरोना काळात लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आल्या होत्या.
लॉकडाऊन संपून दीड वर्ष कालावधी लोटला तरी राज्य परिवहन विभागाने या बसेस सुरू केल्याच नाही. या बसेस सुरू व्हाव्या म्हणून परिसरातील अनेक ग्राम पंचायतीने ठराव दिले, निवेदने दिली. परिसरातील ग्रामस्थांनी राज्य परिवहन विभागाच्या प्रत्येक कार्यालयात, तसेच तहसीलदार ते परिवहन मंत्री, मुख्यमंत्रीपर्यंत निवेदने करण्यात आली. मात्र, ग्रामस्थांच्या या मागणीकडे राज्य परिवहन विभागाने दुर्लक्ष करून या बसेस सुरूच केल्या नाही.
या बसेस बंद झाल्यामुळे वृध्द नागरीक, विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अनेक विद्यार्थींनीना बसेस नसल्यामुळे शाळा सोडण्याची परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी थेट बदनापूर ते जालना रस्त्यावर २३ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भास्कर चव्हाण, सुगनचंद संचेती, सखाराम कसबे, भारत सोनवणे, नंदकिशोर शेळके यांच्यासह नानेगाव, धोपटेश्वर, लोणारभायगाव, किनगाव, रोषणगाव आदी गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
जाणीवपूर्वक दुर्लक्ष
ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेस बंद केलेल्या आहेत. कोरोना निघून गेला तरी बसेस सुरू न झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एसटी महामंडळास अनेक वेळा विनंती करून देखील बसेस सुरू करण्यात आलेला नाही. येत्या दोन दिवसात बदनापूर येथे महामार्ग रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असे सामाजिक कार्यकर्ते सुगनचंद संचेती यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.