आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूक्ष्म अन्न प्रक्रिया:भोकरदन तालुका कृषी कार्यालयात‎ उद्योग योजना कार्यशाळा उत्साहात‎

केदारखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन येथील तालुका कृषी कार्यालयात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत उद्योग कार्यशाळा घेण्यात आली. तालुक्यात अन्न प्रक्रियांचे उद्योग वाढीचे लक्ष भेदून उद्योजक घडवण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, जिल्हा प्रकल्प समन्वयक अर्जुन ठोंबरे यांनी योजनांविषयी मार्गदर्शन केले.

जे शेतकऱ्याच्या शेतात पिकते त्यावर अन्न प्रक्रिया करून तयार झालेला माल पिशवीमध्ये बंद करून विक्रीसाठी बाजारामध्ये उपलब्ध करावा. यावेळी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कंगणे, बचत गट कृषी अधिकारी पाटील, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आदींची उपस्थिती होती. ‎

बातम्या आणखी आहेत...