आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बस सेवा:परराज्यात अडकलेल्या प्रवाशांसाठी नवापूरहून लालपरी महाराष्ट्रात धावणार, मजुरांसाठी मोफत प्रवास सेवा

नवापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सोशल डिस्टन्सचा फज्जा उडल्याचे चित्र आहेसोशल डिस्टन्सचा फज्जा उडल्याचे चित्र आहे

लॉकडाऊनमुळे राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेले मजूर, नागरिक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी नवापूर सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अनेक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात व मध्य प्रदेश, छत्तीसगड सीमावर्ती भागात बस जाणार आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर प्रादेशिक बस स्थानकाचे स्वरूप निर्माण झाले आहे. नवापूर तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जमली आहे.

लहानग्यांसह,महिला पुरुष विद्यार्थी यांची मोठी गर्दी जमली आहे. पायपीट करून दमलेल्या मजुरांनी भर उन्हात सावली न मिळाल्याने चक्क बस खाली निवासाचा आसरा शोधला आहे कोणी बस खाली कुणी टायर समोर कोणी बसमागे झोपून आपला थक

वा काढत आहे. नवापूर, नंदुरबार, साक्री, धुळे डेपो मधील 30 बसेस थांबल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा मध्य प्रदेश व छत्तीसगड सीमावर्ती भागात जाण्यासाठी व्यवस्था केली आहे. नवापूर डेपोचे अधिकारी तात्काळ नोंदणी करून प्रवाश्यांना रवाना करीत आहे. याठिकाणी भोजनाची व्यवस्था बाबा जयगुरूदेव सत्संगी मंडळाने केली आहे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. 

परंतू सोशल डिस्टन्सचा फज्जा उडल्याचे चित्र आहे.याठिकाणी गुजरात राज्यातील अहमदाबाद,बडोदा, सुरत अशा हॉटस्पॉट भागातून आलेल्या विद्यार्थी, कामगार, मजूर आहेत. तरी परिवहन मंडळाचे अधिकारी चालक वाहक व मोटार वाहन निरीक्षक, महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करीत आहे.

महाराष्ट्र परिवहन मंडळाचे अधिकारी मात्र बस मध्ये बैठक व्यवस्था करताना सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करीत आहे व बस रवाना करीत आहे.सोशल डिस्टन्सिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी असेल. अशाप्रकारे एका बसमध्ये साधारणपणे २१ ते २२ लोक बसू शकतात. शेकडो किलोमीटर पायपीट करून भर उन्हात परिवारासह उपाशीपोटी गावी जात होते ही अडचण लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकाराने मोफत बस सेवा सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...