आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेच्या अडीअडचणी:कामे केल्याने जनता पाठीशी राहते

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेच्या अडीअडचणी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाची आवश्यकता नसते, तर प्रामाणिकपणे काम करण्याची ऊर्मी हवी. जनहिताच्या समस्यांवर आवाज उठवत न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यानेच शिवसेनेचा जनाधार आजही कायम असल्याचा विश्वास जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी व्यक्त केला.

माजी उपसभापती डॉ. राजेश राऊत आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीने रविवारी शासकीय विश्राम गृहात भव्य नागरी सत्कार सोहळ्यात भास्करराव आंबेकर बोलत होते. या वेळी दलित आघाडी जिल्हाप्रमुख ॲड. भास्कर मगरे, माजी जि. प.सदस्य बंडू कुमटे, कांतराव रांजणकर, बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले, सरपंच राहुल गवारे, आयोजक डॉ. राजेश राऊत, सुरेश निकाळजे, एम. आर. निक्कम, जीवन खंडागळे, भगवान भिसे, मनोहर गोरे यांची उपस्थिती होती. सत्कारास उत्तर देताना भास्करराव आंबेकर यांनी सार्वजनिक जीवनातील चाळीस वर्षांत नगरसेवक आणि नगराध्यक्ष हीच पदे मिळाली जात-धर्म न पाहता पदाचा उपयोग जनहितासाठी केल्याचे स्पष्ट करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट होईल असा दावाही भास्करराव आंबेकर यांनी केला.

ॲड. भास्कर मगरे यांनी संकटकाळात गरजवंतांना भास्करराव आंबेकर यांनी मदतीचा हात पुढे केल्याचे सांगितले. प्रास्ताविकात डॉ. राजेश राऊत यांनी अठरापगड जाती-धर्मातील सर्वसामान्यांना जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व म्हणून भास्करराव आंबेकर यांची प्रतिमा असून यापुढे राजसत्तेत त्यांचा उदय निश्चित असल्याचा आशावाद डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. सुरेश निकाळजे, एम. आर. निकम यांची समयोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आशिष रसाळ यांनी केले. या वेळी विठ्ठलराव पांडुळे, अर्जुन खंदारे, आकाश बागडे, राजकुमार मुंढे, कैलास कांबळे, कैलास कांबळे, पाटील, दाभाडे, सातपुते, आमीन, कविता दाभाडे यांच्यासह महिला व निष्ठावंत शिवसैनिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...