आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार:शिलाई मशीन देऊन चमनचा राजा हाेणार परित्यक्त्यांचा आधार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवात विविध देवदेवतांचे देखावे सादर करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवणारा चमनचा राजा गणेश मंडळाचे यंदा ३२ वे वर्ष आहे. १९९२ मध्ये अवघ्या पाच ते दहा जणांचा असलेला हा ग्रुप आज १०० जणांचा झाला आहे. कुणालाही वर्गणीची पावती न देता आरतीसाठी स्वखुशीने आलेल्या भाविकांनी दिलेल्या देणगीचा स्वीकार करणारे हे मंडळ आहे. विविध देखाव्यासोबतच गरजूंचा आधार व्हावा म्हणून १० परित्यक्ता महिलांना शिलाई मशीन, तर गरजू दहा विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करून चमनचा राजा मंडळ आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करत आहे.

विविध गणेश मंडळांकडून दरवर्षी विविध देखावे सादर करून गणेशभक्तांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. दरम्यान, जालना शहरातील गांधी चमन येथील चमनचा राजा मित्रमंडळाच्या वतीने नेहमीच विविध देखावे केले जातात. श्रीकृष्णावतार, शिर्डी येथील साईबाबा मंदिराची प्रतिकृती, तामिळनाडूतील पद्नाभम मंदिराचा देखावा, वेलूर येथील महालक्ष्मी, तिरुपती बालाजी मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा देखावा, सागर मंथन, भद्रा मारुती मंदिर, तामिळनाडू येथील नाशक मंदिराचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला होता. हे देखावे जालनेकरांसाठी चांगलेच चर्चित राहिले आहेत. या वर्षीसुध्दा अमरनाथ हा देखावा चांगलाच चर्चिला जाणारा आहे. गणेश मंडळांकडून विविध देखावे करण्यात येत आहेत. त्यापैकी एक गांधी चमन येथील चमनचा राजा गणेश मंडळ हे मागील ३२ वर्षांपासून जालनेकरांसाठी विविध देखावे करतात. या वर्षी अमरनाथ देखावा केला आहे.

गणेश फेस्टिव्हलच्या पदाधिकाऱ्यांचाही पुढाकार : सर्वपरिचित असलेल्या गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील हे अगोदर चमनचा येथे दरवर्षी गणेशाची मूर्ती बसवत होते. १९९२ पासून त्यांचे फेस्टिव्हल हे आता स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा मंडळात कार्यक्रम घेत आहेत. आता या मंडळात १०० जणांचा सहभाग आहे.

कार्यक्रमांचा लाभ घ्यावा
गणेश मंडळ सुरू करणारे व सदस्य असलेल्या सर्वांच्या सहकार्याने मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. देखाव्यांसोबत या वर्षी वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे. मंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने, भाविकांच्या प्रतिसादाने हे उपक्रम पार पडत आहे. - नंदू जावळे, अध्यक्ष, चमनचा राजा मित्रमंडळ, जालना.

बातम्या आणखी आहेत...