आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:कै. दत्ताजी भाले विद्यालयात दहावीच्या निकालात वाढ

अंबड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड येथील कै. दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९७.६१ टक्के लागला आहे. विद्यालयातून परीक्षेला ४२ विद्यार्थी बसले होते त्यापैकी विशेष प्राविण्य १४ विद्यार्थी, प्रथम श्रेणी २० विद्यार्थी, द्वितीय श्रेणी ७ विद्यार्थी प्राविन्य प्राप्त केले.

यात सुयोग नंदकिशोर वाघमारे ८९.८० टक्के प्रथम क्रमांक, प्रज्योष्का प्रदिप धर्माधिकारी ८९.६० टक्के द्वितीय क्रमांक, उमेश रामदास गायकवाड ८६ टक्के तृतीय क्रमांक, गायत्री रामेश्वर तौर८४.२० टक्के चौथा क्रमांक, परिक्षित सुनील कसबेकर ८१.८० गुणानुक्रमे पाचवा. हे सर्व विद्यार्थी व पालक यांचा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णू सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी इयत्ता दहावीचा वर्ग शिक्षिका निशा जोशी यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ज्योती ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परीक्षा विभाग प्रमुख शिक्षक गजानन उबाळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...