आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:लघु व्यवसायासंबंधीच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जालना जिल्हा कार्यालयात सन २०२२ -२३ या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. थेट कर्ज योजनेसाठी कर्ज प्रस्ताव जालना जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराकडून मागविण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील पात्र मातंग समाजातील इच्छुकांनी लघु व्यवसाय करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळण्यासाठीचे प्रस्ताव विहीत नमुन्यातील अर्जासह तीन प्रतीत स्वत: उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक विकास कुंटूरकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय जालनामार्फत मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लघु व्यवसाय करण्यासाठी उमेदवारांना थेट कर्ज योजनेअंतर्गत १ लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे.

सदर योजनेत मोबाईल सर्व्हिसिंग/रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअरिंग (फ्रिज, ऐसी, टीव्ही, मोक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर) होर्डवेअर, ब्यूटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, फुड प्रोडक्ट / प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल/स्टेशनरी स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फॅब्रीकेशन/ वेल्डींग, हार्डवेअर व सेनटरी शॉप, प्रिंटींग, शिवणकला, झेरॉक्स/लॅमिनेशन, हॉटेल, कॅटरिंग सर्विसेस, मंडप डेकोरेशन आदी व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावा.

बातम्या आणखी आहेत...