आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अपघाती विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन; आंबेगावात 51 जणांना विमा कवच

जाफराबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोस्टाच्या माध्यमातून ३९९ रुपयात एका वर्षासाठी १० लाख रुपयाचा अपघाती विमा कवच देण्याची योजना सुरू केली असून, या योजनेचा शुभारंभ जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव येथे जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५१ जणांनी अपघाती विमा कवच काढले.

यावेळी यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडीत, सरपंच मनोज शिंदे, मधुकर देठे, पोष्टमास्तर चंचल सोनकांबळे, ऐश्वर्या लोखंडे, डाकसेवक दीपक फलके,अनिल अंभोरे यांची उपस्थिती होती. म्हस्के म्हणाले की, पोस्टा ही योजना सर्वांसाठी लाभदायक आहे. केवळ ३९९ रुपयात एका वर्षासाठी हा विमा उतरविल्या जात अाहे.यात अपघाती विमा घेतलेल्या वर्षात विमाधारक व्यक्तीचा अपघाताने मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला पोस्टाच्या माध्यमातून १०

लाख देण्याची तरतुद करण्यात आली आहे. तसेच एखादी अपघातग्रस्त व्यक्ती दवाखान्यात उपचार घेत असल्यास त्या व्यक्तीस अडमिट असे पर्यंत प्रतिदिवस एक हजार रुपये मिळतात. तर अपघातात कायमचे अपगंत्व आल्यास अशा व्यक्तीनाहीं १० लाख रुपयाचा धनादेश दिला जातो.

यात ६० हजार रुपयाचा दवाखाना खर्च मिळतो. ओपीडी खर्च म्हणून ३० हजार रुपये ,तसेच अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुंटुंबीयांना दवाखान्यात ये जा करण्यासाठी प्रवासखर्च म्हणुन २५ हजार रुपये मिळतात. तर त्या व्यक्तीच्या मुलांना शैक्षणिक खर्चासाठी १ लाख रुपये आणि अपघाताने पॅरेलिसेस झाला कायमचे अपगंत्व आले तर अशा व्यक्तीसही १० लाखाचे अनुदान मिळते, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...