आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉंग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली १४ नोव्हेंबर सोमवार रोजी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज पुतळा (मोतीबाग) पासून सकाळी १०. ३० वाजता या भारत जोडो यात्रेला सुरवात होणार असून सदरील यात्रा मुक्तेश्वरद्वार, कचेरी रोड, गणपती गल्ली शनिमंदिर चौक, टाउनहॉल, गांधीचमन, मस्तगड, मुथा बिल्डींग, महावीर चौक मार्गे मामा चौक येथे पोहचेल. खा. राहुल गांधी हे नफरत छोडो-भारत जोडो हे घोषवाक्य घेवून कन्याकुंमारी ते काश्मीर पर्यंत पदयात्रा काढत असून यात्रेच्या समर्थनार्थ जालन्यात काढण्यात येणाऱ्या यात्रेत सामील होण्याचे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद तालुकाध्यक्ष वसंत जाधव गटनेते गणेश राऊत , राहुल देशमुख, नंदाताई पवार, बदर साउस, जावेद बेग, आनंद लेखंडे, नारायण वाडेकर शेख शमशुद्दीन, बाबासाहेब सोनवणे, अँड राम कुर्हाडे, चैतन्य जायभाय, चंद्रसंत रत्नपारखे फकीरा वाघ, स. करीम शेख, शेख इब्राहीम, गणेश चांदोडे, सचिन कचरे, जावेद अली हरि पाटील, चंदाताई भांगडीया, शितलताई तनपुरे, मंगलताई खांडेभराड, कृष्णा पडूळ , आदिंनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.