आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवड:ऐन भरात असलेल्या सोयाबीनवर उंटअळी ; कृषी अधिकारी भुते यांनी केली पाहणी

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सोयाबीन पीक हे फुले तसेच शेगा लागण्याच्या स्थितीत आहे. असे असताना शेतकऱ्यांनी यावर येणाऱ्या चक्री भुंगा, उंट अळी अश्या कीड रोग वेळीच थांबवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी रामेश्वर भुते यांनी केले.तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी बाभूळगाव येथील शेतकऱ्यांना सोयाबीन जोड ओळ पद्धतिने लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी कीड रोग व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सध्या सोयाबीन पीक हे फुलोरा अन् शेंगा लागण्याच्या स्थितीत आहे. अश्यावेळी यावर चक्री भुंगा, उंट अळी याचा प्रादुर्भाव होतो. परिणामी याचा उत्पादनाला फटका बसतो. यामुळे शेतकऱ्यांनी यावर लक्ष देत उपाय करावे असे आवाहन त्यांनी केले. शिवाय पिकाची स्थिती पाहता गरज पडल्यास फावरणीतून खत द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी कृषी सहायक संजय बिऱ्हारे कृषी मित्र बालाजी राऊत, शंकर राऊत, गणेश राऊत, दत्तात्रय तुपकर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...