आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास ही संकल्पना घेऊन रामनगर येथील जालना समाजकार्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबिरार्थी जळगाव (ब्राह्मणखेडा) येथे ५ ते ११ जानेवारीदरम्यान ग्रामस्थांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता गावातून प्रभातफेरी काढल्यानंतर शिबिराचे उद्घाटन झाले असून पुढील सहा दिवस लोकसहभागातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली.
पहाटे ५.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत शिबिरार्थींची दिनचर्या निश्चित करण्यात आली असून यात योगा, प्राणायाम, ध्यानसाधना, प्रार्थना, स्फूर्तिगीते, खेळ, मनोरंजन, गाव भेट व चर्चा, व्याख्यान, लोकगीते, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
यात ६ जानेवारी रोजी बालविवाह प्रतिबंध या विषयावर अॅड. कल्पना त्रिभुवन, ७ जानेवारीला मतदान जनजागृतीवर नायब तहसीलदार दिलीप एस. सोनवणे मार्गदर्शन करतील. ८ जानेवारी रोजीच्या आरोग्य शिबिरात डॉ. आशिष राठोड, डॉ. प्रीतेश राठोड, डॉ. प्रीती राठोड आरोग्य तपासणी करणार आहेत. ९ जानेवारी रोजी आधुनिक सत्यशोधक, महामानवांची वाणी आणि गाणी प्रा. डॉ. अनिल मगर हे सादर करतील. १० जानेवारी रोजी जिवरेखा नदी, चला जाणूया नदीला अभियानचे समन्वयक विष्णू पिवळ हे जलसाक्षरता व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करणार आहेत.
११ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. या वेळी सदाशिव भुतेकर व शंकर वायाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, कार्यक्रमाधिकारी प्रा. सुधीर गायकवाड, डॉ. नरसिंग पवार, डॉ. प्रवीण कनकुटे, डॉ. मीना बोर्डे, डॉ. मधू खोब्रागडे आदींनी केले आहे.
शिबिरातील उपक्रम असे
जनजागृती रॅली, मतदान जनजागृती, बालविवाह प्रतिबंध, जलव्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य शिबिर, योगा, वृक्षारोपण, शोषखड्डे तयार करणे, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्त्व विकास आदी उपक्रमांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.