आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिटू सलग्न लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचा मंठा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतमजूर युनियनचे राज्याध्यक्ष मारोती खंदारे यांनी आंदोलनाला पाठींबा दिला. त्यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. आंदोलनाला पाठिंबा दिला. नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात म्हटले की, ग्रामीण भागात ग्रामसेवक खऱ्या कामगारांना प्रमाणपत्रावर सह्या देत नाहीत, परंतु दुसरीकडे कामगार नसलेल्या बोगस लोकांच्या नोंदणी होताना दिसत आहे, दलालामार्फत नोंदण्या सुरू आहेत.
बोगस नोंदणीला आला घालण्यात यावा. असे म्हटले खालील मागण्या करण्यात आल्या. बोगस नोंदणी रद्द करून खऱ्या कामगारांना न्याय द्या., नोंदीत कामगारांना दरमहा भोजन अनुदान खात्यावर द्या., नोंदिकृत कामगारांच्या दोन पाल्यांच्या लग्नास प्रत्येकी २ लाख रुपये सहाय्य द्या.
अपघाती मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना ५लाख रुपये मदत द्या.,कामगारांना घरकुलाचे वाटप करा. या मगण्या करण्यात आल्या.यावेळी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे सचिव ॲड. अनिल मिसाळ, तालुकाध्यक्ष नंदकिशोर प्रधान, अर्जुन वाकळे, सर्जेराव बरसाले, उत्तम उघडे, बाबासाहेब पाटोळे, सलीम शेख, सुंदर प्रधान, विलास कांबळे, रामदास कुडलवड, कचरू बिलोटे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.