आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या सत्र एकच्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १२ जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल २०२३ मध्ये दोन टप्प्यात होणार आहे. त्याच्या तारखादेखील जाहीर केल्या आहेत. कोरोनाकाळात २०२१-२०२२ मध्ये परीक्षेसाठी दिलेल्या सवलती यंदा रद्द केल्या आहेत. बारावीत ७५ टक्के गुणांचा नियम गेल्या परीक्षेत शिथिल केला होता. तो पुन्हा यंदापासून जैसे थे ठेवण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
जेईई मेन्स परीक्षेसाठीच्या सूचनापत्रानुसार आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीत ७५ टक्के गुण अनिवार्य केले आहेत. काेराेनाकाळात दिलेल्या सुविधांमुळे सीबीएसईने अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पात्र न हाेणारे विद्यार्थी जेईई मेन्सच्या गुणांवर एनआयटीमध्ये प्रवेश घेतात. अन्य विद्यार्थी अभियांत्रिकीच्या इतर अभ्यासक्रमांना जेईई मेन्सच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेतात. काेराेनाकाळात विद्यार्थीही मिळालेल्या सुविधांमुळे निश्चिंत होते. मात्र, आता सर्व विद्यार्थ्यांना नियम पाळूनच परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात २४, २५, २७, २८, २९, ३०, ३१ जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे.
काैन्सिलिंगच्या माध्यमातून दिले जाणार प्रवेश यंदा देशभरातील ११२ संस्थांच्या ५४,४७७ जागांवर जोसा (Joint Seat Allocation Authority) काैन्सिलिंगच्या माध्यमातून आयआयटी, एनआयटी ट्रिपल आयटीद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. विद्यार्थी अॅडव्हान्स गुणांच्या आधारे आयआयटी, मेन्सच्या गुणांवर एनआयटी, ट्रीपल आयटी आणि सेंट्रल फंडेडसहित अन्य इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी आता बारावीत ७५ टक्के गुण आवश्यक आहे.
शेवटच्या पाच प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसेल ७५ टक्के गुणांची अट ही पूर्वी होती. फक्त कोरोनाकाळात त्यात सवलत दिली हाेती. ती आता यंदाच्या परीक्षेत पुन्हा जैसे थे केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच बारावीत ७५ टक्के गुण अनिवार्य असेल. मेन्समध्ये एका विषयावर २५ प्रश्न विचारले जातात. आता शेवटचे ५ प्रश्न विचारले जातील. न्युमेरिकल प्रश्न असतील. त्यात इटिंगर टाईप असतील. त्या प्रश्नांची उत्तरे ० ते ९ दरम्यान असतील. आर. बी. गरुड, माजी उपप्राचार्य
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.