आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:गेवराई येथे चार शेतकऱ्यांचा ऊस खाक; लाखोंचे नुकसान, अग्निशामक दलाने विझविली आग

मंठा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील गेवराई येथील चार शेतकऱ्यांचा एकूण सात ते आठ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवार रोजी घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मंठा तालुक्यातील गेवराई शिवारात विद्युत तारांच्या घर्षणामुळे तातेराव खरात, बळीराम खरात, शारदा खरात आणि लक्ष्मण खरात या चार शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस जळून खाक झाला. यामध्ये अंदाजे १४ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत शेतकऱ्यांचे पाइप आणि शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रकरणी तलाठी युनूस पठाण यांनी पंचनामा करून महसूल विभागाला अहवाल पाठवला आहे. दरम्यान, नगरपंचायतच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

बातम्या आणखी आहेत...