आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानाचा ताबा:बोगस पीआर कार्डद्वारे भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानाचा ताबा

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोगस पीआर कार्डद्वारे भाजप पदाधिकारी सुनील राठी यांच्या लक्कडकोटमधील मार्बल दुकानावर एका निलंबित पोलिस कर्मचाऱ्याने ताबा घेतला आहे. याप्रकरणी जवळपास २५० व्यापाऱ्यांनी शनिवारी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. जिल्हाधिकारी येथे उपलब्ध नसल्याने पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना निवेदन देऊन या प्रकरणाची माहिती दिली.

संभाजीनगर प्रभागातील रहिवासी सुनील मोहनलाल राठी व त्यांच्या भावाची नगर परिषद जालनाच्या अधिकारक्षेत्रात मालमत्ता आहे. याच ठिकाणी त्यांचे मार्बलचे दुकान आहे. सुनील राठी हे ३ नोव्हेंबर २०२२ रोजी रोजी दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर येथे एका पोलिसाने दुकानाचे कुलूप तोडून स्वतःचा बोर्ड लावला. त्यामुळे या आरोपीवर कारवाईची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

टोळीला पायबंद न घातल्यास तीव्र आंदोलन करू
बोगस पीआर कार्डवरून दुसऱ्यांच्या मालमत्ता हडपणारी टोळी सक्रिय झालेली आहे. मी ही बाब गतवर्षी तत्कालीन पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली होती. महिनाभरापूर्वी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत नूतन पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केला. मात्र, कसलीही कारवाई झाली नाही. आज मी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोललो. त्यांनी याप्रकरणी २ उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठित केली आहे. आम्ही काही दिवस वाट पाहू. या टोळीला पायबंद न घातल्यास तीव्र आंदोलन आणि वेळप्रसंगी जालना शहर बंद ठेवू. - कैलास गोरंट्याल, आमदार

बातम्या आणखी आहेत...