आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:इब्राहिमपूर फाट्याजवळ कार अन् दुचाकीचा अपघात; 1 ठार, 2 गंभीर

भोकरदन/ फत्तेपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन-सिल्लोड मार्गावरील इब्राहिमपूर फाट्याच्या काही अंतरावर असलेल्या वळणावर मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीचालक ठार, तर कारमधील दाेन जण गंभीर जखमी झाले. चरणसिंग अजबसिंग बेडवाल (३३, इब्राहिमपूर, ता. भोकरदन) असे मृताचे नाव आहे.

मृत चरणसिंग अजबसिंग बेडवाल हा सिल्लोड येथे ट्रक व शेतीसंबंधी औषधी व खत आणण्यासाठी दुचाकीवरून सकाळी सिल्लोड येथे गेला होता. परत येताना त्याच्या घराच्या पाचशे मीटर अंतरावर सिल्लोड-भोकरदन मार्गावरील वळणावर कार व दुचाकीचा अपघात झाला. यात बेडवाल ठार झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त लोकांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. कारमधील गंभीर शेख इक्बाल (६६), बिल्किस कुरेशी (६०) यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पुढील तपास अरुण वाघ, गोरख नामदे, संदीप गिरी हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...