आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:जालना-औरंगाबाद महामार्गावर कारची ट्रेलरला धडक; एक ठार

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कारने ट्रेलरला पाठीमागून जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला. जालना-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन औद्योगिक वसाहत क्रमांक तीनजवळ हा अपघात झाला. विजयकुमार अग्रवाल असे या घटनेतील मृताचे नाव आहे. विजयकुमार अग्रवाल (५३, रा. भरतनगर, जालना) हे कारने (एमएच २१ एएक्स २२७०) शनिवारी दुपारी औरंगाबादकडे जात होते. ट्रेलर (एमएच १४ एफटी १३३२) औरंगाबादकडे जात होता. जालना-औरंगाबाद महामार्गावरील औद्योगिक वसाहतीजवळ आल्यावर कारने ट्रेलरला पाठीमागून धडक दिली.

यात कारचालक विजयकुमार अग्रवाल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चुराडा झाला.

बातम्या आणखी आहेत...