आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार-रिक्षाचा अपघात; 1 जण ठार

धावडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा-बुलडाणा राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवरील भोरखेडा गावाजवळ कार व रिक्षाचा अपघात झाला. यात एक जण ठार एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ६ जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील रिक्षाचालक वालसावंगी येथून प्रवासी सोडून शिवनाकडे परत जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील भोरखेडा या गावाजवळ अजिंठाकडून बुलडाणाकडे जाणारी डिझायर कार (एम एच ४९ बी ५७१६) व रिक्षा एम एच २० टी ४९१०) या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. रिक्षाचालक शेख मोहसीन शेख कय्युम (३५, शिवना, ता. सिल्लोड) हा जागीच ठार झाला. तर डिझायर कारचा चालक मोहंमद शफीक मोहम्मद साबिर (२८, जोहरनगर, बुलडाणा) व कारमधील तिघे जखमी झाले आहे. त्यांना बुलडाणा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेचा पंचनामा करून पारध पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी जीवन भालके, वाघ, खरात, मोरे, यांनी पुढील तपास धावडा बीटचे जमादार दांडगे करीत आहे‌.

बातम्या आणखी आहेत...