आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचा मृत्यू:सिंदखेडराजा चौफुलीजवळ कारचे टायर फुटून अपघात; चालकाचा मृत्यू

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. यात कार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील सिंदखेडराजा चौफुलीजवळ बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. मिथुन शामराव राठोड (२५, कनकेवाडी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे.

या विषयी पोलिस सूत्रांनी सांगितले की, मिथुन राठोड हे नांदेड येथून मालकाला औरंगाबाद येथील विमानतळाहून आणण्यासाठी कार घेऊन औरंगाबादकडे जात होते. सिंदखेडराजा चौफुलीजवळ कारचे टायर अचानक फुटले.

त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन धडकून विरुद्ध दिशेने जाऊन उलटली. या अपघातात मिथुन राठोड याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदर बाजार ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, वरगणे, बोडखे हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह कारच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणी करिता जिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...