आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर दोष:शिबिरात 152 बालकांची हृदयरोग तपासणी ; साई संजीवनी हॉस्पिटल तर्फ मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, जालना क्रिटिकल केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी आयोजित मोफत हृदयरोग निदान शिबिरात १५२ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यात हृदयात गंभीर दोष आढळून आलेल्या बालकांवर मुंबईच्या खारघर भागातील सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

जन्मजात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची तपासणी सत्य साई संजीवनी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. आशिष बानपूरकर, डॉ. संतोष वाडीले यांनी केली. यावेळी टू डी इको तपासणीही मोफत करण्यात आली. दरम्यान, तपासणी करण्यात आलेल्यांपैकी शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर क्लबतर्फे लवकरच हृदयरोग तज्ञ डॉ. स्नेहल कुलकर्णी ह्या शस्त्रक्रिया करतील, असे डॉ. अनुप कासलीवाल यांनी सांगितले.

यावेळी सेंट्रलचे अध्यक्ष गिरीश गिंदोडीया, डॉ. आशुतोष सोनी, डॉ. अनुप कासलीवाल, डॉ. हितेश रायठठा, डॉ. सागर गंगवाल, डॉ. नीलेश सोनी, राहुल तोतला, डॉ. अरविंद सोनी, डॉ. मनिष राठी, डॉ. भूषण मणियार, डॉ. राजीव जेथलिया, सचिन लोहिया, सीए सागर कावना, भरत गादीया, आदेश मंत्री, उमेश बजाज, नितीन नवलखा, किशोर पंजाबी, परेश रायठठा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...