आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन:राष्ट्रीय रुरबन ची प्रलंबित  कामे डीपीआरनुसार करा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे निर्देश

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन योजनेंतर्गत परतूर तालुक्यातील १६ गावाच्या सर्वांगीण विकासासाठीची कामे डीपीआरनुसार पूर्ण करण्याची जबाबदारी त्या त्या विभागाची असून प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

राष्ट्रीय रुरबन मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय नियामक समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक व्ही. के. खिल्लारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. नंदनवनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, कार्यकारी अभियंता ए. ए. चौरे, गटविकास अधिकारी ए. जी. गोळनवार आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, परतुर तालुक्यातील आष्टीसह १६ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय रुरबन मिशन योजनेत या गावांचा समावेश करण्यात आला होता.

या गावांमध्ये विकास कामाचा डीपीआर तयार करण्यात येऊन त्यानुसार निधीचे वितरणही करण्यात आले आहे. ज्या विभागांची कामे अद्यापही प्रलंबित असतील ती कामे प्राधान्याने पूर्ण करुन घेण्यात यावीत.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी १६ गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, सिमेंट काँक्रिटीकरण, शाळांना आवार भिंतीचे बांधकाम, बसस्थानक, मिनी एमआयडीसीसाठी युनिट शेड, प्रशासकीय इमारत, विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा, कोल्ड स्टोअरेज, वेअर हाऊस, आवारभिंत यासह इतर कामांचा विस्तृत आढावा घेतला. या वेळी अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...