आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण:शून्य थकबाकी मोहीम राबवा, महावितरण कंपनीचे आवाहन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोळशाचा तुटवडा असल्यामुळे अनेक राज्यातील जनतेला भारनियमनाची झळ सोसावी लागत आहे. महाराष्ट्रात अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कडक उन्हाळयात महागडया दराने वीज खरेदी करून ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात येत आहे.विकलेल्या विजेचे दरमहा पैसे वसूल झाले तरच वीज खरेदी करून वीज पुरवठा करणे शक्य आहे. यासाठी विकलेल्या विजेचे दरमहा वीज बिलासह थकबाकी वसूल करून शुन्य थकबाकी मोहीम राबवा. अन्यथा थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करा, असे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.

महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत परिमंडलातील अभियंत्यांची व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे विशेष आढावा बैठक घेंण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महावितरण आणीबाणी प्रसंगी राज्यातील जनतेला भारनियमनाची झळ बसू नये यासाठी अनेक मार्गाने महागडया दराने वीज खरेदी करून वीज पुरवठा करत आहे. गेल्या १९ दिवसापासून राज्यात ग्राहकांना अखंडित भारनियमनमुक्त सुरळित वीज पुरवठा करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...