आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया:शासकीय नेत्र विभागात 7 महिन्यांत 1200 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या ७ महिन्यात ११८८ जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून ९२१ जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. आठवड्यात तीन दिवस मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जात असून गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. उदयण परीतकर यांनी केले आहे.

या उपक्रमांतर्गत अंधाचे सर्वेक्षण करणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे व शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून दृष्टिदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना चष्मा पुरवठा केला जात आहे. गत दोन वर्षे कोरोनामुळे या कार्यक्रमावर बंधने आली होती मात्र चालु वर्षात नेत्र विभागातील सेवा पूर्ववत झाल्या आहेत. यात १०७६ मोतीबिंदू तर ११२ फेको शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच थोडेसे मायबाप या उपक्रमांतर्गत ४० वर्षांवरील १० हजार ६४२ नागरिकांची नेत्र तपासणी केली असून यातील ३२०९ जणांना चष्म्याचा नंबर निघाला. यापैकी ९२१ जणांना चष्मे वाटप केले आहेत, यामुळे त्यांनासुद्धा डोळ्यांनी स्पष्ट दिसायला मदत झाली.

जिल्ह्यातील दोन हजार शालेय विद्यार्थ्यांना दृष्टिदोष
गत ७ महिन्यांत जिल्ह्यातील ५६ हजार ८६१ शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली असता २०९१ जणांना दृष्टिदोष आढळून आला. यामुळे त्यांनासुद्धा चष्म्याची शिफारस करण्यात आली असून शासनाकडून चष्मेही मागवल्याचे डॉ. परीतकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...