आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया:21 रुग्णांमध्ये आढळून आला मोतीबिंदू; औरंगाबादेत त्यांच्यावर होणार मोफत शस्त्रक्रिया

पारध23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे घेण्यात आलेल्या मोफत नेञ तपासणी शिबीर व मोतीबिंदु शस्ञक्रिया शिबिरात २३० जणांची तपासणी करण्यात आली असून यात २१ जणांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले.

स्व. हरिवंशराय बच्चन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व लाल बहाद्दुर शास्ञी सांस्कृतिक युवा क्रिडा मंडळ, पारध संचलित स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कुल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच लायन्स नेञ रुग्णालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने “स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव यांच्या १९ व्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य मोफत नेञ तपासणी शिबीर व मोतीबिंदु शस्ञक्रिया शिबिर शुक्रवारी घेण्यात आले. मोतीबिंदु असल्याचे निष्पन्न झालेल्या रुग्णांवर औरंगाबाद येथे शस्ञक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती विक्रांत श्रीवास्तव यांनी दिली.

यावेळी महंत नागेशगिरीजी महाराज, सपोनि अभिजित मोरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मनिष श्रीवास्तव, रजनीदेवी श्रीवास्तव, उपसंरपंच शेखर श्रीवास्तव, विक्रांत श्रीवास्तव, डॉ. प्रभाकर काळे, डॉ. नेहा कुंटेकर, निलेश पवार, योगेश निकाळजे, संतोष मंजुळे, पंढरीनाथ लोखंडे, देवेंद्र श्रीवास्तव, शेषराव लोखंडे, साहेबराव लोखंडे, सखाराम लोखंडे, नरेंद्र श्रीवास्तव, अरुण श्रीवास्तव, संदिप क्षिरसागर, शिवा तेलंग्रे, अक्षय श्रीवास्तव, दिनेश सुरडकर, दिनेश भारती, जगदीश लोखंडे, श्रीराम लोखंडे, तुळसीराम लोखंडे, श्रीराम डोईफोडे, सलीम पठाण, बाबुराव काकफळे, बबलु तेलंग्रे, जगन्नाथ लोखंडे, गणेश लोखंडे, समी पठाण, रविंद्र लोखंडे, गजानन देशमुख, समाधान तेलंग्रे, तेजराव दांडगे, रमेश जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...