आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोशाळा सुरू:गोसंवर्धन होणे काळाची नितांत गरज; सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे यांनी केले आवाहन

शेलूद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या गायींचे प्रमाण खूप कमी होत चालले असून गोसंवर्धन होणे काळाची गरज आहे. कारण गाईचे दूध आईच्या दुधात खूप साम्य आहे. नवीन पिढीला गाईच्या दुधाची चव चाखायला मिळाली पाहिजे म्हणून गोशाळा निर्माण झाल्या पाहिजे, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी सांगितले.

भोकरदन तालुक्यातील पारध शाहुराजा येथे स्व. राजेंद्र श्रीवास्तव यांच्या १९ व्या स्मृतीप्रित्यर्थ महंत नागेशगिरीजी महाराज यांच्या शुभशीर्वादाने चिञगुप्त भगवान गोशाळा सुरु करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी महंत नागेशगिरीजी महाराज, रजनीदेवी श्रीवास्तव यांची उपस्थिती होती. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, उपसरपंच शेखर श्रीवास्तव, विक्रांत श्रीवास्तव या बांधवांनी त्यांच्या शेतात गोशाळेची स्थापना केली. मनिष श्रीवास्तव म्हणाले, आम्ही फक्त गोशाळा स्थापन करुन थांबणार नाही तर ती यशस्वीपणे चालवणार आहोत. तालुक्यातील कुणाकडे म्हताऱ्या, भाकड, आजारी गायी असतील तर त्यांनी गो शाळेत दाखल करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला पंढरीनाथ लोखंडे, देवेंद्र श्रीवास्तव, शेषराव लोखंडे, साहेबराव लोखंडे, सखाराम लोखंडे, नरेंद्र श्रीवास्तव, अरुण श्रीवास्तव, संदिप क्षिरसागर, शिवा तेलंग्रे, अक्षय श्रीवास्तव, दिनेश सुरडकर, दिनेश भारती, जगदीश लोखंडे, श्रीराम लोखंडे, तुळसीराम लोखंडे, श्रीराम डोईफोडे, सलीम पठाण, बाबुराव काकफळे, बबलु तेलंग्रे, जगन्नाथ लोखंडे, गणेश लोखंडे, समी पठाण, रविंद्र लोखंडे, गजानन देशमुख, समाधान तेलंग्रे, तेजराव दांडगे, रमेश जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...