आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:ढगाळ वातावरणामुळे फुलकोबी पिकास फटका

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकरी असून मागील आठवडाभरापासून परिसरात ढगाळ वातावरण असल्याने गोबी पिकाला मोठा फटका बसला आहे. ढगाळ वातावरणात गोबीचे पिके फुले एकाच वेळी फुलल्याने बाजारामध्ये कोबीची आवक वाढली आहे.

यामुळे आठवडी बाजारात पाच ते दहा रुपयेप्रमाणे कोबीची विक्री झाली. बहुतांश शेतकऱ्यांनी कोबी फेकूनही दिली हिरवी ८० रुपये किलो विकणारी कोबी सद्य:स्थितीत दहा रुपये किलोप्रमाणे विकली जात आहे. यामुळे काढणीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोबी उत्पादक शेतकरी असून या वर्षी ढगाळ वातावरणाचा मोठा फटका या पिकाला बसले असल्याचे उत्पादकांनी सांगितले. येथील अनेक शेतकऱ्यांनी कोबीच्या पिकावर नांगर फिरवला कोबीच्या पिकामुळे मोठे नुकसान झाल्याचे कोबी उत्पादक शेतकरी सुभाष तांबेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...