आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस खरेदी:भोकरदनला सीसीआय कापूस खरेदी

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन बाजार समिती कार्यक्षेत्रात शुक्रवारी उपबाजार राजूर येथे शुक्रवारी सी.सी.आय. मार्फत खुल्या बाजार पद्धतीने (राजुरेश्वर कोटेक्स जिनिंग) मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक शरदराव तनपुरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रथम कापूस घेऊन येणारे शेतकरी रामदास भिकनराव पिंपळे यांचा सत्कार करण्यांत आला. यावेळी सी.सी.आयचे केंद्र प्रमुख पंकज ठाकरे तसेच जालना सीसीआयचे केंद्रप्रमुख सचिन ढोरे, सहाय्यक निबंधक संजय भोईटे, जिनिंग फॅक्टरीचे मालक विठ्ठलराव पाटील बाजार समितीचे सचिव संतोष ढाले पाटील, बाजार समितीचे कर्मचारी तळेकर, अनिल रोकडे, हरि पवार यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होते. येथील कापूस खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल ८५०० रुपये दराने कापूस खरेदी सुरू केली आहे. यावेळी बाजार समितीचे प्रशासक शरद तनपुरे व सचिव संतोष ढाले, सीसीआयचे केंद्रप्रमुख पंकज ठाकरे यांनी कापूस बाजारभावाप्रमाणे खरेदी केला जाणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...