आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न:प्लास्टिकमुक्त, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा; इंजि. अनया अग्रवाल यांचे भाविकांना आवाहन

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. तथापि वाढत्या प्रदूषणास आळा घालण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेश उत्सवात सजावट, महाप्रसाद, भंडारा यासाठी प्लास्टिकच्या वस्तू, साधने यांचा वापर न करता स्वच्छतेस प्राधान्य देऊन मांगल्याचे प्रतिक असलेला पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे आवाहन स्वच्छता दूत, महाराष्ट्र सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या सल्लागार तथा परिवर्तन संस्थेच्या अध्यक्षा इंजि. अनया अग्रवाल यांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात इंजि. अनया अग्रवाल यांनी म्हटले आहे की, धार्मिकतेसोबतच सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता, संपन्नता याचे प्रतिक असलेला गणपती बाप्पा चा उत्सव कोरोना संसर्गजन्य परिस्थिती नंतर यंदा धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळे, श्री भक्त जोमाने सज्ज झाले आहेत. प्रशासनाकडून सुध्दा पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवोसाठी प्रतीवर्षाप्रमाणे परिवर्तन संस्था प्रयत्नशील असून, यंदाही संस्थेतर्फे जालना शहरात प्रबोधन केले जात आहे. नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्तीस प्राधान्य द्यावे, घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी सजावट करतांना प्लास्टिकचा वापर टाळावा, भंडाऱ्यांत महाप्रसाद प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्या, पत्रावळी, द्रोण, ग्लास वापरावेत, गणेश मंडळांनी दहा दिवसांचे निर्माल्य संकलन करावे, परिवर्तन संस्थेच्या वतीने कंपोस्ट खत निर्मिती साठी निर्माल्य संकलन केले जाणार असून नागरिकांनी निर्माल्य फेकून प्रदुषण करू नये. असे आवाहन अनया अग्रवाल यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...