आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय ग्राहक दिन जागरण पंधरवडा १५ ते ३१ डिसेंबर पर्यंत साजरा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन अखील भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले असून संबधित यंत्रणेला त्या सूचना द्याव्यात, असे म्हटले आहे.
निवेदनात म्हटले, ग्राहक दिन साजरा करण्याच्या संबंधाने केलेल्या नियोजनात शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना, ग्राहकांना आवश्यक असलेली सर्व माहिती या गोष्टीचा समावेश असावा यासाठी कॉलेज, शाळा, वस्त्या, उपवस्त्या ग्रामीण भागातील छोटी-मोठी खेडी अशा सर्व ठिकाणी ग्राहक जागरणाचे कार्य करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे, यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तसेच ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पथनाटय, निबंधस्पर्धा, महिला मंडळ, विविध स्पर्धा, शेतकरी मेळावे अशा उपक्रमाद्वारे व्यापक जनसंपर्क करून ग्राहक जागरणाचे कार्य करण्यासाठी नियोजन करण्यात यावे.
ग्राहक जागरण पंधरवाडयामध्ये नव्याने आलेला ग्राहक संरक्षण कायदा, अन्नसुरक्षेच्या बाबतीत विविध माहिती ग्राहकांना पुरवणे, नव्याने आलेल्या तंत्रामुळे ग्राहकांच्या आवडीची झालेली ऑनलाईन व त्यातील फसवणुकीपासून कसे सावध राहावे यासंबंधीची माहिती. दैनंदिन जीवनात उदभवणाऱ्या खरेदीसंबंधी विविध कायद्याची माहिती, वैधमापनशास्त्र संबंधीच्या मुलभूत अधिकाराची माहिती इत्यादी बाबींचा जागरण उपक्रमामध्ये समावेश असावा. असे या निवेदनात अखील भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकास्तरीय पदाधिकारी धर्मराज खापरे, हरीचंद्र गावडे, किर्तीनंद गांगुर्डे यांच्यासह ग्राहक पंचायतच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.